राजकीय
पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठक
By nisha patil - 5/18/2026 6:21:49 PM
Share This News:
पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठक
जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठीआज कार्यालयामध्ये बैठक पार पडली गेली. दोन महिन्यापासून पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन अंकुश संघटनेकडून आवाज उठवला जात आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी बैठक पार पडली बैठकीमध्ये इचलकरंजी महापालिका प्रोसेसधारक आणि आंदोलन यांच्याकडून आपापल्या भूमिका मांडण्यात आल्या सर्वांची मते जाणून जिल्हाधिकारी सोयांनी बैठकीला मार्गदर्शन केले त्याप्रमाणे बैठकीमध्ये इचलकरंजीमधील प्रोसेसधारकांनी त्यांचे सी इ टी पी प्लांट पूर्ण क्षमतेने चालवावा आणि प्रक्रिया केलेलेच पाणी जे आहे ते शेतीला देण्यात यावं त्यासाठी पुरेसे शेती उपलब्ध करावे अन्यथा क्षेत्र असेल त्याच क्षमतेने प्रोसेस चालवाव्यात क्षेत्र उपलब्ध नसतील तर प्रोसेस बंद ठेवाव्यात.
त्यासाठी प्रदूषण महामंडळाने व महसूल विभागाने तातडीने कारवाया पूर्ण कराव्यात . इचलकरंजी महापालिकेने सुद्धा एसटीपी प्रोजेक्ट पूर्ण क्षमतेने चालवून शुद्ध करूनच पाणी इतर कारणासाठी वापरायचा आहे. भविष्यामध्ये इचलकरंजीतील औद्योगिक प्रोसेसने झेड एल डी प्रोजेक्ट उभारण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत तसेच पंचगंगा नदीकाठच्या सर्व महापालिका नगरपालिका ग्रामपंचायती यांनी दररोजच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करायचे आहे त्यासाठी तात्काळ पावले उचलावीत त्यासाठी जिल्हाधिकारीसो प्रत्येक पंधरवड्याला आढावा घेणार.
बैठकीसाठी जिल्हाधिकारी राठोड सो इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदेसो तहसीलदार महेश खिल्लारीसो तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे प्रदूषण महामंडळाचे अधिकारी प्रमोद माने इचलकरंजी प्रोसेस युनियनचे अध्यक्ष तेरदाळे तसेच आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील राकेश जगदाळे विश्वास बालिघाटे नागेश काळे अमोल गावडे गोपाल चव्हाण अंकुश पाटील डॉक्टर शिवाजी पाटील शिवाजी काळे अनिल हूपरीकर स्वप्निल चौगुले महेश जाधव शशिकांत काळे मंगेश नलवडे एकनाथ माने सुनील सेवेकरी इत्यादी उपस्थित होते
पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठक
|