बातम्या

विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठी बैठक

Meeting for waste management in airport area


By nisha patil - 3/10/2025 3:22:19 PM
Share This News:



विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठी बैठक

कोल्हापूर, दि.३: भारतीय वायू अधिनियम २०२४ नुसार विमानतळापासून १० किमी परिसरात कचरा उघड्यावर टाकणे, प्रक्रिया करणे, कत्तलखाने, मत्स्य व्यवसाय यांना मनाई आहे. या पार्श्वभूमीवर करवीर उपविभागीय अधिकारी सौ. मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली उजळाईवाडी ग्रामपंचायतीत मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली.

बैठकीस विमानतळ संचालक अनिल शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. संजय भंडारी, सरपंच उत्तम आंबवडे, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व स्वच्छता दूत उपस्थित होते.

  • चौगुले यांनी कचऱ्याचे पृथःकरण घराघरांतून सुरू करण्याचे आवाहन केले. “आजच जबाबदारी घेतली नाही तर भविष्यात गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

  •  शिंदे यांनी पक्ष्यांच्या आकर्षणामुळे विमानवाहतुकीस धोका निर्माण होतो व अपघातांची शक्यता वाढते, हे स्पष्ट केले. विमानतळ परिसरातील झाडे, बांधकामे व अडथळे नियमावलीनुसार हटविण्याची मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

  • सरपंच आंबवडे यांनी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची माहिती दिली व जिल्हा नियोजन मंडळामार्फत या कामास गती देण्याचे आश्वासन दिले.

बैठकीदरम्यान स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. स्वच्छता पंधरवडा (स्वच्छोत्सव) अंतर्गत हा उपक्रम हाती घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठी बैठक
Total Views: 70