बातम्या
चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयात बैठक
By nisha patil - 8/21/2025 4:52:23 PM
Share This News:
चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयात बैठक
अभयारण्यग्रस्त व मलकापूर नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा निघावा : आ. विनय कोरे
मुंबई मंत्रालय येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याचा निर्धार चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले. यावेळी मलकापूर नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण नियमित करण्याची कार्यवाहीमलकापूर (ता. शाहूवाडी) गायरान गट क्र. ६८/अ वरील अतिक्रमण नियमानुसार नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला.नियमित केलेल्या भूखंडांचे प्रॉपर्टी कार्ड लवकरच नागरिकांना देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
आमदार डॉ. विनय कोरे यांनी अभयारण्यग्रस्त व मलकापूर नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा निघावा अशी मागणी केली, ज्यावर महसूल मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयात बैठक
|