बातम्या

गाळप हंगामातील अडचणी सोडविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापुरात बैठक

Meeting in Kolhapur on Friday to resolve


By nisha patil - 10/29/2026 9:48:30 PM
Share This News:



गाळप हंगामातील अडचणी सोडविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापुरात बैठक
 

गाळप हंगामातील अडचणींवर शुक्रवारी कोल्हापुरात बैठक.... 
 

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; ....ऊस वाहतूकदार व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा...... 
 

 प्रतिनिधी, आचिन हेरवाडे सन २०२६-२७ च्या गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार आणि संबंधित घटकांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) दुपारी २ वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
 

प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग यांच्या वतीने या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, साखर उद्योगाशी संबंधित लोकप्रतिनिधी आणि साखर आयुक्तालयातील क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 

या बैठकीत गाळप हंगाम २०२६-२७ सुरू करण्याबाबत व ऊस दराबाबत, भरारी पथकांकडून ऊस जळण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याबाबत, ऊस वाहतूकदार संघटनांच्या निवेदनांबाबत तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
 

बैठकीसाठी विविध शेतकरी संघटना, ऊस वाहतूकदार संघटना आणि संबंधित घटकांच्या प्रतिनिधींनाए उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाळप हंगाम सुरू होत असताना ऊस दर, वाहतूक आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत कोणते निर्णय होतात, याकडे शेतकरी व ऊस वाहतूकदारांचे लक्ष लागले आहे.


गाळप हंगामातील अडचणी सोडविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापुरात बैठक
Total Views: 501