विशेष बातम्या

प्रभाग क्रमांक 20 मध्ये इच्छुक उमेदवारांची बैठक; भाजप प्रदेश सचिव महेश जाधव यांचे मार्गदर्शन

Meeting of interested candidates in Ward

By nisha patil - 11/12/2025 5:35:36 PM
Share This News:

प्रभाग क्रमांक 20 मध्ये इच्छुक उमेदवारांची बैठक; भाजप प्रदेश सचिव महेश जाधव यांचे मार्गदर्शन

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी बूथ अध्यक्षांची बैठक आयोजित केली. या बैठकीत प्रभागातील संघटनात्मक तयारी, बूथस्तरीय रचना व निवडणूक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकीत बूथची मजबुती, घर-घर संपर्क व मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला.

या बैठकीत मंडलाध्यक्ष विनय खोपडे, सौ. व श्री अभय तेंडुलकर, सौ. व श्री राजू जाधव, योगेश ओठावकर, सौ. वाडकर वहिनी तसेच सर्व बूथ अध्यक्ष उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 20 मध्ये इच्छुक उमेदवारांची बैठक; भाजप प्रदेश सचिव महेश जाधव यांचे मार्गदर्शन
Total Views: 18