बातम्या

कोल्हापूर शहरातील डी.पी. रस्ते व आरक्षणे TDR माध्यमातून विकसित करण्याबाबत बैठक

Meeting regarding the development of DP

By nisha patil - 12/9/2026 9:05:48 PM
Share This News:

कोल्हापूर शहरातील डी.पी. रस्ते व आरक्षणे TDR माध्यमातून विकसित करण्याबाबत बैठक

कोल्हापूर शहरातील दुसऱ्या विकास आराखड्यातील (DP Road) रस्ते  construction TDR च्या माध्यमातून तसेच महापालिकेच्या ताब्यात आलेली आरक्षणे  AMMENITY TDR च्या माध्यमातून विकसित करण्यासंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.

बैठकीत कन्स्ट्रक्शन TDR व अमेनिटी TDR च्या माध्यमातून विकासकामांना गती देणे तसेच TDR प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी CREDAI चे जयेश कदम, अभिजीत मगदूम, विद्यानंद बेडेकर, महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे), अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपअभियंता महादेव फुलारी व चेतन आरमाळ उपस्थित होते.

कोल्हापूर शहरातील डी.पी. रस्ते व आरक्षणे TDR माध्यमातून विकसित करण्याबाबत बैठक
Total Views: 13