बातम्या
*आजरा येथे बी एस एन एल ची 5जी सेवा तातडीने सुरू करण्याबाबत बहुजन मुक्ती पार्टीचे निवेदन*
By nisha patil - 10/28/2026 9:43:31 PM
Share This News:
*आजरा येथे बी एस एन एल ची 5जी सेवा तातडीने सुरू करण्याबाबत बहुजन मुक्ती पार्टीचे निवेदन*
आजरा तालुक्यात बी एस एन एल ची 5जी सेवा तातडीने सुरु करण्याबाबत महाप्रबंधक भारत संचार निगम लिमिटेड कोल्हापूर जिल्हा यांना बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
*आजरा(हसन तकीलदार):- निवेदनात म्हटले आहे की,सध्या बी एस एन एल ची 4जी सेवा उपलब्ध आहे. मात्र, आजच्या डिजिटल युगात शिक्षण, ऑनलाइन व्यवसाय, ई-गव्हर्नन्स, बँकिंग, आरोग्य सेवा, उद्योग, कृषी तसेच विविध ऑनलाइन सेवांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यासाठी अधिक वेगवान आणि आधुनिक इंटरनेट सेवेची आवश्यकता आहे.
आजरा तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, उद्योजक तसेच सरकारी व खासगी क्षेत्रातील कर्मचारी यांना 5जी सेवेचा मोठा लाभ होणार आहे. इतर खाजगी दूरसंचार कंपन्या 5जी सेवा उपलब्ध करून देत असताना BSNL ग्राहकांनाही त्याच दर्जाची आधुनिक सेवा मिळणे आवश्यक आहे.
त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आपणास नम्र विनंती करण्यात येते की, तालुका आजरा येथे BSNL ची 5जी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नागरिकांना लवकरात लवकर 5जी सुविधा उपलब्ध करून द्यावी. सदर निवेदनासोबत आजऱ्यातील 1000 ग्राहकांच्या सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.आणि सकारात्मक विचार करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सद्या आजरा शहरात व तालुक्यात 4 जी सुविधा असतानाद्धा नेटवर्क आणि रेंज गायब असते. त्याचप्रमाणे रेंज कमी असल्यामुळे इंटरनेट वापर कमी होत असतानाही डाटा लवकर संपत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विश्वासाहर्तेवर शंका उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे सेवेत सुधारणा करण्याची मागणीही पुढे येताना दिसत आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने यांच्यासोबत बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*आजरा येथे बी एस एन एल ची 5जी सेवा तातडीने सुरू करण्याबाबत बहुजन मुक्ती पार्टीचे निवेदन*
|