बातम्या
*प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे मानसिक आरोग्य तपासणी शिबिर ११३ रुग्णांची तपासणी*
By nisha patil - 11/28/2025 4:07:47 PM
Share This News:
*प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे मानसिक आरोग्य तपासणी शिबिर ११३ रुग्णांची तपासणी*
आजरा (हसन तकीलदार):- २७ नोव्हेंबर २०२५ रोजी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी येथे नागरिकांसाठी मानसिक आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.यावेळी ११३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा मुख्य उद्देश नागरिकांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन व उपचार पद्धतीची माहिती देणे हा होता.यावेळी डॉ. कुलकर्णी मॅडम,डॉ. बेळगुंद्री ,डॉ. आर. जी. गुरव,डॉ. शेख मॅडम या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
रुग्णांना मानसिक ताण, चिंता (Anxiety), झोपेचे विकार, उदासीनता (Depression) यांसारख्या समस्यांबाबत समुपदेशन आणि योग्य उपचार पद्धतीची सविस्तर माहिती देण्यात आली.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मानसिक आरोग्य सेवांचा लाभ त्यांच्या सोयीनुसार मिळाला असून, उपस्थितांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
*प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे मानसिक आरोग्य तपासणी शिबिर ११३ रुग्णांची तपासणी*
|