बातम्या

मानसिक छळ, विवाहबाह्य संबंध आणि संशयास्पद मृत्यू—गौरी प्रकरणाने उचलले वादळ

Mental torture, extramarital affairs and suspicious


By nisha patil - 11/24/2025 1:08:11 PM
Share This News:



पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याबाबत गंभीर शंका व्यक्त केली जात असून प्रकरणावर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत.

गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न होत असून प्रत्यक्षात ही हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांवर गौरी यांना मारहाण करून मानसिक छळ दिला तसेच आत्महत्येस प्रवृत्त केले, असे आरोप आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अनंत गर्जे यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे गौरी यांच्यावर सतत मानसिक ताण येत होता. त्यातच नणंदेकडूनही मानसिक छळ होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. लग्नाला अवघे दहा महिने झाले असताना घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष तपासासाठी विविध स्तरांतून मागणी होत असून पंकजा मुंडे यांनीही पोलिसांना योग्य आणि काटेकोर तपास करण्याचे आवाहन केले आहे.


मानसिक छळ, विवाहबाह्य संबंध आणि संशयास्पद मृत्यू—गौरी प्रकरणाने उचलले वादळ
Total Views: 15