विशेष बातम्या
जिल्ह्यात पारा 12° वर! कडाक्याच्या थंडीनं नागरिक त्रस्त
By nisha patil - 11/12/2025 5:41:55 PM
Share This News:
जिल्ह्यात पारा 12° वर! कडाक्याच्या थंडीनं नागरिक त्रस्त
जिल्ह्यातील तापमान तब्बल १२ डिग्रीवर घसरल्याने दिवसभर अंगातील हुडहुडी कमी होत नाही. पहाटेपासूनच थंडीचा कडाका वाढत असून सकाळी दहापर्यंत घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दिवसभर वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा कायम राहतो.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. किमान तापमान १२ डिग्री तर कमाल २८ डिग्री नोंदले जात असून पुढील आठ दिवस हेच वातावरण कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
शेती, नदी-तलाव परिसरात थंडी अधिक जाणवत असून ग्रामीण भागातील शेतीकाम, ऊसतोड आणि जनावरांच्या देखभालीवर परिणाम झाला आहे. सकाळ-सायंकाळ ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.
कडाक्याची ही थंडी ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक त्रासदायक ठरत असून त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पारा 12° वर! कडाक्याच्या थंडीनं नागरिक त्रस्त
|