राजकीय

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

Meritorious persons felicitated at the general meeting of the Municipal Corporation


By nisha patil - 5/19/2026 12:49:03 PM
Share This News:



महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

 

आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या हस्ते गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कु.शुभ्रा सचिन खाडे (स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व-4 या रियॅनिटी शो मध्ये गाण्याचे चांगले प्रदर्शन करुन महाअंतिम फेरित सुरेल आवाजाने परिक्षक व  महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकून महाविजेता झाल्याबद्दल), कु.शुभांगी मधुकर घराळे (शहरात उदभवणाऱ्या कोणत्याही आपत्तीमध्ये कोल्हापूर जिल्हा महिला प्रमुख म्हणून आपत्ती व्यवस्थापनात काम करत असून सन 2019 व 2021 मध्ये आलेल्या महापूरामध्ये पुरग्रस्त असलेल्या भागातील नागरिकांची मदत  तसेच सन 2020 ते 2022 च्या कोविड -19  च्या काळातसुध्दा सामाजीक भान राखून चांगली कामगिरी केली त्यामुळे 1 मे 2026 रोजी जिल्हा स्तरीय युवा पुरस्थाराने पालकमंत्री यांच्या हस्ते गौरविणेत आलेबद्दल), श्री. ललित परमार व जयेश ओसवाल कोल्हापूर महानगरपालिका येथे सामाजिक बांधिलीकीतून नागरिकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याचे वॉटर कुलर दिलेबद्दल), कु.रोहित दिपकराव चव्हाण (अहमदाबाद येथे होणा-या जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड, तसेच डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 मध्ये सगमनेर येथे झालेल्या सुपाईन योगा प्रकारात वरिष्ठ गटात सुवर्ण पदक मिळविलेबद्दल), कु. अमृता शशिकांत पुजारी (सोलापूर या ठिकाणी आयोजित करणेत आलेल्या 4 थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेवून महाराष्ट्र केसरी किताबाची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तिच्या क्रिडा क्षेत्रातील  कौतुकास्पद उल्लेखनीय कार्याबद्दल) व कु.वेदिका हंबीराव सासने (सोलापूर या ठिकाणी आयोजित करणेत आलेल्या 4 थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेवून उप महाराष्ट्र केसरी किताबाचा व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

 

तिच्या क्रिडा क्षेत्रातील कौतुकास्पद उल्लेखनीय कार्याबद्दल) कु.ओंकार शिंदे व कु.सतिश आयरे (पापाची तिकटी येथील महराष्ट्राचे अराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांची दैनंदिन स्वच्छता करुन स्मारकाचे नित्य पुजन करतात त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल) कु.स्वरुपा अशोक राऊत (अपंगत्व विसरुन जिद्दीने दहावीचे परीक्षेत 80 टक्के गुण प्राप्त केले या शैक्षणिक क्षेत्रातील कौतुकास्पद, उल्लेखनिय कार्याबद्दल) कु.गीत सौरभ जगताप (दिल्ली येथे 15 ते 22 एप्रिल 2026 दरम्यान झालेल्या स्कुल गेम्स फेडिरेशन ऑफ इंडिया आसोजित 14 वर्षाखालील स्कुल नॅशनल चॅम्पीयनशिपमध्ये सहभाग घेवून टेबल टेनिस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलेबद्दल) कु.पिंटू आनंदा हेगडे (कचरा गोळा करताना कचरा टिप्पर गाडी क्रमांक एमएच 09 एफएल 3920 या टिप्पर वाहनामध्ये सापडलेली सोन्याची अंगठी सनगर गल्ली येथील जेष्ठ महिला इंदूमती शामराव पाटील यांना परत दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल) बाबासाहेब कासीम मुल्ला (वयाच्या 77 व्या वर्षी देखील जाती धर्माला छेद देत करवीर निवासिनी श्री अंबाबाई, छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी रथावर पुष्पवृष्टी करण्याची परंपरा 26 वर्षा पासून जपली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे समाजरत्न व समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले बद्दल) या सर्वांचा महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह  पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

 

यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती दिपा ठाणेकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेता इंद्रजित बोंद्रे, शारंगधर देशमुख, आदिल फरास, सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसचिव सुनील बिद्री, नगरसेवक/नगरसेविका  अधिकारी उपस्थित होते.


महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार
Total Views: 14