विशेष बातम्या
गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शाहू साखर कारखान्याचे भूषण – सुहासिनीदेवी घाटगे यांचे प्रतिपादन
By nisha patil - 6/30/2025 5:39:26 PM
Share This News:
गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शाहू साखर कारखान्याचे भूषण – सुहासिनीदेवी घाटगे यांचे प्रतिपादन
कागल, : "गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी हे शाहू साखर कारखान्याचे खरे भूषण आहेत," असे प्रतिपादन कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमात केले.
शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये 294 विद्यार्थ्यांना 9 लाख 51 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमातून आजअखेर 5614 विद्यार्थ्यांना एकूण 1 कोटी 71 लाख 30 हजार रुपयांचे शैक्षणिक सहाय्य लाभले आहे.
श्रीमती घाटगे म्हणाल्या, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शिक्षण संकुल, वसतिगृह, यशश्री इंग्लिश स्कूल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आणि राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमी स्थापन करण्यात आली आहे."
कार्यक्रमात उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक युवराज पाटील, सचिन मगदूम, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, फायनान्स मॅनेजर आर. एस. पाटील आदी उपस्थित होते.
शिष्यवृत्ती योजनेत मुलींचा सहभाग अधिक असून, त्यांना प्रोत्साहन म्हणून अधिक शिष्यवृत्ती रक्कम देण्यात येते. यावर्षी विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग ही योजना यशस्वीपणे रुजल्याचे द्योतक आहे.
गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शाहू साखर कारखान्याचे भूषण – सुहासिनीदेवी घाटगे यांचे प्रतिपादन
|