मनोरंजन
भक्त पुंडलिकाचा संदेश – गणराज मंडळाचा भावस्पर्शी देखावा
By nisha patil - 6/9/2025 11:24:24 AM
Share This News:
भक्त पुंडलिकाचा संदेश – गणराज मंडळाचा भावस्पर्शी देखावा
गणराज ग्रुप जोतिबा डोंगर यांनी आपली परंपरा अबाधित राखत देखावा सादर केला.
गणराज मंडळाने यंदा केवळ देखावाच उभारलेला नाही, तर मनाला स्पर्श करणारा संदेश दिला आहे. या वर्षी मंडळाने निवडलेला विषय आहे भक्त पुंडलिकाची कथा.
भक्त पुंडलिक आपल्या आई-वडिलांच्या सेवेत इतका तल्लीन झाला होता की देवही त्याच्या दारी उभे राहून समाधानी झाले. ही कथा आपल्याला सांगते की ईश्वरप्राप्तीचा मार्ग मंदिराच्या दारातूनच नव्हे तर आई-वडिलांच्या पायाशीही सापडतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला हा देखावा जागवणारी घंटा आहे. काळ बदलला, साधनं बदलली, पण मूल्यं मात्र शाश्वतच राहिली आहेत.
भक्त पुंडलिक याने जसे आई-वडिलांच्या सेवेतून देवाला संतुष्ट केले, तसेच आजची तरुण पिढीही आपल्या पालकांना आधार, प्रेम आणि सन्मानाचा अमृतसिंचन करो, हीच कलाकारांची आणि समाजाची प्रार्थना आहे.
पुंडलिक- सुजल शिंगे.
पुंडलिकाची आई -सुप्रिया पाटिल.
पुंडलिकाचे वडील -विष्णु सातर्डेकर. पुंडलिकाची पत्नी - दिपाली भालेराव.
श्री कृष्ण- गणेश बुने.
विठ्ठल -संतोष शिंगे
वारकरी -रमेश शिंगे,ओंकार सुतार,संजू सांगळे.
प्रकाशयोजना - अर्जुन पिसाळ
निर्मिती -अजित झूगर
भक्त पुंडलिकाचा संदेश – गणराज मंडळाचा भावस्पर्शी देखावा
|