ग्रामीण

मातोंडमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अभियान; धर्मजागृतीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Message of Environmental Conservation Alongside Cultural Awareness at Matond


By nisha patil - 6/18/2026 5:43:58 PM
Share This News:



सिंधुदुर्ग | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. हिंदुत्ववादी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आयोजित या उपक्रमातून धर्मजागृतीसोबतच निसर्गसंवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

‘आईसाठी एक झाड लावा’ या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्याचा प्रयत्न जिल्हाभरात विविध मंडलांमध्ये सुरू आहे. हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे धर्मसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास मातोंडच्या सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर, सोशल मीडिया प्रमुख श्रीकृष्ण (राजू) परब, पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब, राहुल प्रभू, ग्रामपंचायत सदस्या सौ. किशोरी परब, सौ. सुजाता सावंत, वेताळ प्रतिष्ठानचे सचिन परुळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबुराव खवणेकर तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते किशोर परब, अनिल परब, श्रीकांत परब, संतोष सावंत, प्रदीप जबडे, वसंत खाजणेकर, संतोष परब आणि अविनाश परब आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.


धर्म आणि पर्यावरणाचा सुंदर संगम; मातोंडमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाला प्रतिसाद
Total Views: 12