बातम्या
महावीर सुकृत योगा फाउंडेशन च्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती महावीर गार्डनमध्ये साजरी
By nisha patil - 6/26/2026 3:04:48 PM
Share This News:
महावीर सुकृत योगा फाउंडेशन च्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती महावीर गार्डनमध्ये साजरी
कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंती दिनानिमित्त महावीर गार्डन येथे महावीर सुकृत योगा फाउंडेशनच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.या फाउंडेशनचे संस्थापक श्री सुरेशचंद्र शहा, सौ. उल्काजी शहा यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अरपन करून अभिवादन केले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. पांडुरंग पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन व कार्य यावर व्याख्यान दिले. शाहू महाराजांचे विचार आजही अत्यंत पूरक व समाजाला दिशा दर्शक असून समृद्ध समाजासाठी ते आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
सुरेशचंद्र शहा म्हणाले, शाहू महाराजांनी उद्योग, व्यापार, शेती यांना चालना देऊन मोठी प्रगती साधली. गुळाचा व्यापार त्यांनी देशभर पोहोचवला.
यावेळी माजी मुख्याध्यापिका सौ.महानंदा कदम ,श्री सुरेंद्र सुर्वे, विजया शिरुगुपीकर, सुवर्णा घाटे, सतीश वडणगेकर ,श्री अकोलकर यांनी शाहू महाराजांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक श्री सुरेंद्र सुर्वे यांनी केले .श्री मिलिंद दिघे यांनी आभार मानले . यावेळी महावीर सुकृत योगा फाउंडेशन चे शंभरहून अधिक सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.
महावीर सुकृत योगा फाउंडेशन च्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती महावीर गार्डनमध्ये साजरी
|