राजकीय
अध्यक्ष पदी मिलिंदर मोरे सचिव पदी तनवीर काकतिकर यांची निवडबिनविरोध निवड
By nisha patil - 11/2/2026 3:33:47 PM
Share This News:
अध्यक्ष पदी मिलिंदर मोरे सचिव पदी तनवीर काकतिकर यांची निवडबिनविरोध निवड
आजरा (हसन तकीलदार) :- आजरा आगार एस.टी. कामगार सेनेच्या कार्यकारिणी 2026 आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी मिलिंदर मोरे तर सचिव पदी तनवीर काकातिकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज रविवार दिनांक 10.02.2026 रोजी आजरा आगाराच्या 2026 च्या नव्याने कार्यकारणी निवड कार्यक्रमा निमित्ताने महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत व सरचिटणीस हिरेनजी रेडकर यांच्या आदेशानुसार विभागीय सचिव नामदेव रोडे,विभागीय अध्यक्ष वसंत पाटील आणि आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार व शहर प्रमुख समीर चांद ,सिंधुदुर्ग अध्यक्ष अनुप नाईक यांच्या झालेल्या आढावा बैठकीत आजरा आगारातील एसटी कर्मचारी यांच्या विविध अडचणीवर व इतर विषयांवर चर्चा झाली यावेळी इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
यावेळी सर्व सेना टीम यांनी आज खेळी मेळीच्या वातावरणात बैठक आयोजित करून सकारात्मक बाब घेऊन व प्रथम कामगार हित जोपासून सेना वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असा निश्चय करण्यात आला.
संपूर्ण कोल्हापूर विभाग हा भगवामय झालाच पाहिजे. त्या अनुषंगाने सर्वांनी पुढे कार्य करत राहणे आवश्यक आहे.आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्या साठी सदा तत्पर रहावे असे या वेळी ठरले.
आदरणीय रेडकर यांनी आजपर्यंत कर्मचाऱ्यांची साथ कधीच सोडलेली नाही व कामगार प्रश्न मार्गी लावण्यात ते अहोरात्र तत्पर असतात,त्यामुळे त्यांची सुद्धा आपण साथ देणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्या अनुषंगाने सर्व कामगारांनी भगवा हाती घेण्याचा निश्चय केला आहे. याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग अध्यक्ष व अनुप नाईक आणि प्रादेशिक सचिव संदीप घाटगे यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
आजच्या बैठकीला आवर्जून उपस्थित सर्व सेना पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांनी खूप महत्वाच्या गोष्टी वर चर्चा करण्यात आली.
मी माझ्या एसटी कर्मचाऱ्याला आलेल्या अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच करेन आणि केव्हाही मदतीसाठी हाक मारा मी कुठेच कमी पडणार नाही, असे आश्वासन मिलिंदर मोरे यांनी आगार अध्यक्ष पद पुन्हा स्वीकारताना बैठकीत मार्गदर्शन करताना अभिवचन दिले. तसेच तनवीर काकतीकर यांनी देखील सर्वांचे आभार मानले.
सदर बैठकीला जितेंद्र देसाई,किरण येरंडोळकर,किशोर कांबळे,उत्तम चव्हाण,गिलबिले अण्णा,राजू पंधरे,पुरुषोत्तम कनाके,नारायण हत्तळगे,उमेश सरदेसाई,वैभव यादव,संदीप खवरे, गिरीश पोवार
यांची उपस्थिती होती.
अध्यक्ष पदी मिलिंदर मोरे सचिव पदी तनवीर काकतिकर यांची निवडबिनविरोध निवड
|