बातम्या

पालकमंत्री आबिटकर यांनी ठेका धरताच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित

Minister Abitkar


By nisha patil - 8/9/2025 2:17:48 PM
Share This News:



पालकमंत्री आबिटकर यांनी ठेका धरताच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित...

 भुदरगड :- प्रतिनिधी - (प्रकाश खतकर) गंगापूर येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत आपला लाडका आमदार आला गाण्यावर  ठेका धरल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून येत होता.

 भुदरगड  तालुक्यातील गंगापूर येथील जय हिंद कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ. महा आरती सोहळा आणि गणेश विसर्जन सोहळ्यात चक्क गणपती च्या गीतावर महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ठेका धरला आणि सारे गंगापूर रहिवाशी चकीत झाल्याचे दिसून येत होते.
              सतत कामाचा ध्यास मनी घेऊन चोवीस तासनतास जनतेच्या गराड्यात जनतेच्या विकास कामासाठी झटणारे. मात्र  थोडा वेळ काढून जयहिंद गंगापूर च्या 19 व्या  गणेश विसर्जन सोहळ्यात गणेशभक्तांच्या सोबत गीतावर ठेका धरला. आणि आपला आनंद द्विगुणीत केला.
             यावेळी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते. शिवाजी जाधव, विजय सुतार,अदिती जाधव, चेतन डवरी. तसेच भाषण स्पर्धा, रांगोळी,चित्रकला आदी विजेत्यांचे सत्कार त्यांनी केले.
         याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव,तानाजी जाधव,  दिगंबर कल्याणकर, दयानंद किल्लेदार,  रामदास किल्लेदार, युवराज पाटील,बाबासो पाटील, जयसिंग जाधव, भैरू  गुरव, मारुती तोरसकर, संजय पाटील, विनायक गोडसे,  मंडळाचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. ढेरे, प्रा. कांबळे  व प्रा. अतुल पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा न्याय्य व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

उपस्थितांचे आभार अध्यक्ष राकेश लोकरे मानले.तर सूत्रसंचालन मारुती घाटगे यांनी केले.
 


पालकमंत्री आबिटकर यांनी ठेका धरताच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित
Total Views: 62