राजकीय
पदवीधर-शिक्षकांच्या मतांसाठी मंत्री चंद्रकांत पाटील मैदानात! कोल्हापुरात घरोघरी प्रचार
By nisha patil - 10/17/2026 4:24:36 PM
Share This News:
पदवीधर-शिक्षकांच्या मतांसाठी मंत्री चंद्रकांत पाटील मैदानात! कोल्हापुरात घरोघरी प्रचार
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देत त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचार मोहिमेदरम्यान भाजपचे कोल्हापूर शहराध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे आणि आप्पा लाड उपस्थित होते.
निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारांच्या भेटीगाठींवर विशेष भर दिला. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देऊन मतदान करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी महायुतीकडून प्रचाराचा जोर वाढवण्यात आला असून, मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याच्या रणनीतीवर भर दिला जात आहे.
पदवीधर-शिक्षकांच्या मतांसाठी मंत्री चंद्रकांत पाटील मैदानात! कोल्हापुरात घरोघरी प्रचार
|