बातम्या
मुरगूड शहरातील सांडपाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय मंत्री हसन मुश्रीफ यांची हमी
By nisha patil - 11/28/2025 5:20:59 PM
Share This News:
मुरगूड शहरातील सांडपाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय मंत्री हसन मुश्रीफ यांची हमी
मुरगूड/वार्ताहर मुरगूड शहरातील सांडपाणी प्रश्न गेली अनेक वर्षे अत्यंत गंभीर बनला आहे. एक हाती सत्ता द्या, अंडरग्राउंड ड्रेनेजची आधुनिक व सक्षम व्यवस्था उभारून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
मुरगूड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सावर्डेकर कॉलनी परिसरात मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारसभा पार पडल्या.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, शहरातील वाढती लोकसंख्या, अपुरी ड्रेनेज व्यवस्था व जुनाट गटारी यांमुळे सांडपाणी थेट नदीत वाहून जात आहे. या दुषित पाण्याचा गंभीर परिणाम नदीकाठावरील गावांवर होत असून, नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.
शाहू उद्योग समूहाचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,
मुरगूड शहराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी माझी इच्छा आहे. मुरगूडचे नियोजनबद्ध, शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहराची प्रत्येक गरज आणि समस्या आमच्यासाठी महत्त्वाची आहे.
घाटगे म्हणाले, मुरगूडला आधुनिक सुविधा, स्वच्छ व सुंदर वातावरण, सक्षम पायाभूत सुविधा आणि तरुणांसाठी संधी उपलब्ध करून देणे हेच पुढील काळातील आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
याप्रसंगी गोकुळ माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, प्रा.चंद्रकांत जाधव, संताजी कारखाना कार्यकारी संचालक संजय घाटगे यांची भाषणे झाली.
यावेळी राजे बॅंक संचालक दतामामा खराडे,बिद्री संचालक
सुनीलराज सुर्यवंशी,शाहु कृषी चेअरमन अनंत फर्नाडीस, संजय चौगले,विकास पाटील- कुरूकलीकर आदीसह असंख्य कार्यकर्ते हजर होते.
मुरगूड शहरातील सांडपाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय मंत्री हसन मुश्रीफ यांची हमी
|