बातम्या

पुणे पदवीधर निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रिफांचे मतदान; कागलमध्ये बजावला मतदानाचा हक्क!

Minister Hasan Mushrif casts his vote for the Pune


By nisha patil - 10/23/2026 11:07:37 AM
Share This News:



पुणे पदवीधर निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रिफांचे मतदान; कागलमध्ये बजावला मतदानाचा हक्क!

पुणे विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू झाली. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी सकाळी ८ वाजता कागल येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्या मंदिरातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

मतदान प्रक्रियेला सुरुवात होताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपले मत नोंदवले. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या या मतदान प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


पुणे पदवीधर निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रिफांचे मतदान; कागलमध्ये बजावला मतदानाचा हक्क!
Total Views: 7