बातम्या
महाराणी ताराराणी समाधीस्थळ जिर्णोद्धाराचा प्रस्ताव महिन्याभरात शासनाकडे सादर करण्याचे निर्देश – मंत्री हसन मुश्रीफ
By nisha patil - 4/21/2025 10:41:00 PM
Share This News:
महाराणी ताराराणी समाधीस्थळ जिर्णोद्धाराचा प्रस्ताव महिन्याभरात शासनाकडे सादर करण्याचे निर्देश – मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, दि. 21 – करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या संगम माहुली (सातारा जिल्हा) येथील समाधीस्थळाच्या जिर्णोद्धारासाठीचा सुमारे 26 कोटी रुपयांचा आराखडा महिन्याभरात शासनाला सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
या जिर्णोद्धाराच्या कामासाठी दोन टप्प्यांत योजना राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात समाधीचे संरक्षण तर दुसऱ्या टप्प्यात नूतनीकरण होईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून गड-किल्ले संरक्षणासाठी असलेल्या 3% निधीचा वापर करण्यात येणार आहे.
या संदर्भातील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झाली. यामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे, समाधी समितीचे विजय देवणे, पुरातत्व व बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सहभाग घेतला.
आराखडा अंतिम करण्यापूर्वी समाधी समिती सदस्यांच्या सूचनांचा विचार केला जाणार असून, लवकरात लवकर काम सुरू होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महाराणी ताराराणी समाधीस्थळ जिर्णोद्धाराचा प्रस्ताव महिन्याभरात शासनाकडे सादर करण्याचे निर्देश – मंत्री हसन मुश्रीफ
|