शैक्षणिक
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लिंगणूर दुमालामध्ये पहिलीतील विद्यार्थ्यांचे गोड स्वागत
By nisha patil - 6/16/2025 3:32:16 PM
Share This News:
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लिंगणूर दुमालामध्ये पहिलीतील विद्यार्थ्यांचे गोड स्वागत
फुले, चॉकलेटने स्वागत… लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची उधळण
लिंगणूर दुमाला (ता. कागल) येथील विद्यामंदिर शाळेत वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे फुले व चॉकलेट देऊन मनोहर स्वागत करण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला.
यावेळी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, माजी सभापती रमेश तोडकर, केंद्रप्रमुख एस. व्ही. पाटील, सरपंच छाया कुंभार, उपसरपंच मधुकर मोरबाळे, तसेच शाळा समिती अध्यक्ष संतोष शिंदे, मुख्याध्यापक सदानंद यादव, व स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लिंगणूर दुमालामध्ये पहिलीतील विद्यार्थ्यांचे गोड स्वागत
|