बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ गट सचिवांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्ती आदेश

Minister Hasan Mushrif issues appointment orders to 37 group


By nisha patil - 9/29/2025 5:41:01 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ गट सचिवांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्ती आदेश
       
श्री मुश्रीफ यांनी स्वीकारला केडरच्या अध्यक्षपदाचा पदभार
      
कोल्हापूर, दि. २९: कोल्हापूर जिल्हा देखरेख संस्थेच्या म्हणजेच केदारच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील ३७ गट सचिवांच्या नेमणुकांचे नियुक्ती आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गट सचिवांना देण्यात आले. कोल्हापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था म्हणजेच केडरचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार गट सचिवांच्या हस्ते झाला.

               
नियुक्ती आदेश मिळालेल्या गट सचिवांची तालुका निहाय संख्या अशी, करवीर १0, पन्हाळा ०१, शाहूवाडी २, कागल ०२, राधानगरी ०४, चंदगड ०३, गगनबावडा ०५, शिरोळ ०६, गडहिंग्लज ०१, भुदरगड.
              
यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सहकार हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. यामध्ये गावागावातील विकास सेवा संस्थांचे स्थान महत्त्वाचे आहे. तसेच; जिल्हा मध्यवर्ती बँका आणि विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासद यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारा गटटसचिव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मी व्यक्तीशा: आणि केडीसीसी बँक सदैव गट सचिवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. 
     
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांच्या गट सचिवांच्या सेवाविषयक बाबी कोल्हापूर जिल्हा देखरेख सहकारी संरथा मर्यादित कोल्हापूर यांचे वतीने नियंत्रित केल्या जातात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ६९ (१) अन्वये सदर संस्थेचे पुनर्जीवन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांनी पदभार स्वीकारला आहे.

 

कार्यक्रमाला माजी आमदार राजेश पाटील संचालक,  सुधीर देसाई , रणजितसिंह पाटील, जिल्हा निबंधक नीलकंठ करे, मुख्य कार्यकारी अधिकारी युसुफ शेख हे हजर होते.


कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ गट सचिवांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्ती आदेश
Total Views: 61