बातम्या

तोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन 

Minister Hasan Mushrif pays obeisance at the feet of Lord Hanuman in Toranhalli


By nisha patil - 5/10/2026 4:31:58 PM
Share This News:



तोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन 
​               
मूर्तीला शिजवलेल्या दहीभाताच्या लेपासह बांधली पूजा

             
तोरणहळ्ळी, दि. ४: तोरणहळ्ळी ता. चिकोडी येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री. हनुमानाच्या चरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ लीन झाले. यावेळी श्री. हनुमानाच्या मूर्तीला शिजवलेल्या दहीभाताच्या लेपा सह फुलांची पूजा बांधण्यात आली.

                
अतिशय जागृत व भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाविषयीची अधिक माहिती अशी,  रामायणातील दाखल्यानुसार सीतामाईचा शोध घेण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र,  लक्ष्मण आणि हनुमान लंकेमध्ये गेले होते. त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांसमवेत हनुमान हे सावलीसारखे सोबत होते. त्यावेळी राक्षसांसोबतच्या लढाईत लक्ष्मण गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत गेले. त्यावेळी तिथल्या वैद्यांनी सांगितले की फक्त हिमालय पर्वतामध्ये मिळत असलेली संजीवनी बुटीच यावर औषध म्हणून इलाज आहे. त्या झाडपाल्यामुळेच लक्ष्मणाला शुद्ध येऊ शकते.  त्यावेळी हनुमानाने उड्डाण करून हिमालय गाठला आणि तो डोंगर घेऊन येत असताना काही वेळ तोरणहळ्ळीच्या या माळावर थांबल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे या हनुमान मंदिराला फार मोठा इतिहास आहे. 
              
यावेळी पुजाऱ्यांनी सांगितले की, ज्या- ज्या वेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काही संकटे आणि अडीअडचणी येतात, त्या त्या वेळी ते तोरणहळ्ळीच्या हनुमानाला लीन होतात. या मंदिरासमोर वैयक्तिक मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यावतीने देणगी म्हणून दीपमाळेचे बांधकाम सुरू आहे. दगडी शिल्पकलेतील कोरीव काळ्या पाषाणातील दगडांपासून सुरू असलेले हे काम अंतिम टप्प्यात आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जागा वाटपावरून निर्माण झालेला तिढा, पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून त्यांचे जीवाभावाचे सरसेनापती प्रताप उर्फ भैया माने यांना महायुतीची न मिळालेली उमेदवारी, त्यामुळे श्री. माने यांनी "मुश्रीफसाहेब, मला माफ करा......." असे म्हणत अशा परिस्थितीत नाही इलाजास्तव दूर जावे लागत असल्यचे पत्राद्वारे केलेले भावनिक स्पष्टीकरण या पार्श्वभूमीवर श्री. मुश्रीफ यांनी तोरणहळ्ळीला जाऊन दर्शन घेतल्याचे बोलले जात आहे.
​              
सकाळी नऊ  वाजता कागलमधून निघून मंत्री श्री. मुश्रीफ साडेदहाच्या सुमाराला तोरणहळ्ळी ता. चिकोडी या गावामध्ये पोहोचले. मंदिर संस्थांच्या परंपरेनुसार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते शिजवलेल्या भाताचा व दह्याचा लेप श्री. हनुमान मूर्तीला देण्यात आला व श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते हनुमानाची पूजा झाली. 
............
    
तोरणहळ्ळी ता. चिकोडी येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री हनुमान मंदिरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेतले व हनुमान चरणी लीन झाले. या मंदिरासमोर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने रू. ५१ लाख रुपये खर्चून कोरीव काळ्या पाषाणातील दगडांपासून शिल्पकलेतील दीपमाळेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.


तोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन 
Total Views: 18