बातम्या

करवीर निवासीनी आई श्री. अंबाबाई देवीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले दर्शन

Minister Hasan Mushrif visited


By nisha patil - 9/26/2025 2:37:22 PM
Share This News:



करवीर निवासीनी आई श्री. अंबाबाई देवीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले दर्शन
         
अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या सुखासाठी घातले देवीला साकडे     

      
कोल्हापूर, दि. २६: शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री  हसन मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाईचे घेतले दर्शन घेतले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी राज्यातील जनतेसाठी सुख, समृद्धी व आरोग्याची प्रार्थना केली.

       
यावेळी मंत्री  मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी आई श्री अंबाबाई देवीला साकडे घातले. ते म्हणाले, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे. या अस्मानी संकटातून सावरण्याची त्यांना शक्ती दे.
         
श्री. अंबाबाई मंदिर परिसरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या सहयोगातून आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामधून नवरात्री उत्सवाच्या काळात येणाऱ्या भाविकांच्यासाठी विविध औषधोपचार व अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येत आहे. श्री.  मुश्रीफ यांनी या शिबिराला भेट दिली.  
      
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकीयेन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, सामाजिक कार्यकर्ते व सी. पी. आर. चे आरोग्य मित्र बंटी सावंत आदी प्रमुख उपस्थित होते.
     


करवीर निवासीनी आई श्री. अंबाबाई देवीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले दर्शन
Total Views: 70