ताज्या बातम्या

बेनिक्रेचे ग्रामदैवत श्री. भावेश्वरी देवीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले दर्शन

Minister Hasan Mushrif visited the village deity of Benikere Shri Bhaveshwari Devi


By nisha patil - 2/21/2026 11:22:15 AM
Share This News:



बेनिक्रेचे ग्रामदैवत श्री. भावेश्वरी देवीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले दर्शन
     
मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात
             
कलशारोहण समारंभास उपस्थिती व दर्शन
          
बेनिक्रे :- बेनिक्रे ता. कागल येथील ग्रामदैवत श्री. भावेश्वरी देवी श्री. विठ्ठलाई देवी मंदिराचा वास्तुशांती सोहळा मोठ्या उत्साहात झाला.  मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कलशारोहण सोहळ्यानिमित्त गावाला भेट देत श्री. भावेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. ग्रामस्थांच्यावतीने मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार झाला.
                 
याबाबत अधिक माहिती अशी, गावासह पंचक्रोशीची ग्रामदैवत श्री. भावेश्वर देवीवर अपार श्रद्धा आहे. या देवीचे जुने मंदिर जीर्ण झाल्याने ग्रामस्थांनी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेला ४० लाख रुपये निधी व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून ६० लाख रुपये, असे एक कोटी रुपयांतून सुंदर मंदिराचे बांधकाम झाले आहे.
           
आज दिवसभरात महाप्रसादासह श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील प. पू. गुरुप्रसाद दिगंबर पुजारी, संभाजीनगर येथील गोंडेश्वर संस्थानचे स्वामी संपूर्णानंद सरस्वती, श्रीक्षेत्र आळंदी येथील ह. भ. प. प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या हस्ते कलशारोहण झाले.
          
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती शशिकांत खोत, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील- कुरूकलीकर,  युवराज जाधव यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


बेनिक्रेचे ग्रामदैवत श्री. भावेश्वरी देवीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले दर्शन
Total Views: 18