बातम्या
"फादर ऑफ ड्रामा" च्या घराला मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट
By nisha patil - 9/19/2025 12:23:23 PM
Share This News:
"फादर ऑफ ड्रामा" च्या घराला मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट
कोल्हापूर, दि. १८ : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळासह सध्या लंडन व स्कॉटलंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी जागतिक स्तरावर सर्वश्रेष्ठ कवी, लेखक आणि नाटककार म्हणून ओळख असलेल्या विल्यम शेक्सपियर यांच्या स्ट्रॅटफोर्ड शहरातील घराला भेट दिली.
लंडनपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेले हे घर ब्रिटिश सरकारने संरक्षित स्मारक म्हणून जतन केले आहे. शेक्सपियर यांच्या जन्मस्थळाला भेट दिल्याचे समाधान व्यक्त करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले,
"शेक्सपियर यांची नाटके व काव्ये अजरामर आहेत. त्यांच्या शोकांतिका आजही जगभर गाजत आहेत. हॅम्लेट, मॅकबेथ, ऑथेलो, किंग लियर, रोमियो अँड ज्युलियट ही त्यांची कालातीत नाटके साहित्यविश्वासाठी मार्गदर्शक ठरली आहेत. त्यांच्या साहित्याचा प्रभाव मराठी साहित्यावरही प्रकर्षाने जाणवतो. 'फादर ऑफ ड्रामा' म्हणून शेक्सपियर यांना लाभलेला लौकिक अद्वितीय आहे."
शेक्सपियर यांची नाटके जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित झाली असून त्यांचे असंख्य प्रयोग आजही रंगभूमीवर सादर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
"फादर ऑफ ड्रामा" च्या घराला मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट
|