बातम्या
माणगावात येथे अल्पवयीन मुलीचा खून
By nisha patil - 10/18/2026 11:55:08 AM
Share This News:
माणगावात येथे अल्पवयीन मुलीचा खून
फाॅरेन्सिक पथक सह श्वान पथकांस पाचारण
माणगाव ता. हातकणंगले येथील सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय.. ही घटना शनिवार दि १७ रोजी रात्रौ ९ च्या दरम्यान घडली. घटनेमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली असून. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाकडून घटनास्थळाची तपासणी करण्यात येत असून संशायिताचे शोधासाठी पोलिसांचे पथक रात्रौ उशीरपर्यंत शोध मोहीम राबविले.
संबंधित मुलगी नववीच्या वर्गात शिकत असून संशयित मंदिर परिसरात ध्वनीमुद्रणाचे आवाजात संबंधित मुलीच्या गळ्यावर धारदार शास्त्राने वार केला. वार इतका जोरदार होता की मुलीचे गळा निम्मा चिरलेला होता .शिवाय दंडावर वार झाल्याने जागेवरच गतप्राण झाली. आवाज ऐकताच परिसरातील नागरिक जमा झाले.. तात्काळ इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले.. तपासणी नंतर वैद्यकीय पथकाने मुलीस मृत घोषीत केले.
माणगावात येथे अल्पवयीन मुलीचा खून
|