विशेष बातम्या

मिस क्लार्क वस्तीगृह हे गुणवत्तेचे संस्कार केंद्र — डॉ. दगडू माने

Miss Clarke Dormitory is a center of excellence


By Administrator - 6/27/2025 4:23:04 PM
Share This News:



मिस क्लार्क वस्तीगृह हे गुणवत्तेचे संस्कार केंद्र — डॉ. दगडू माने

समाजभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा शाहू जयंतीनिमित्त सत्कार

शिरोळ / कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापुरातील मिस क्लार्क वस्तीगृहात शाहू जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. दगडू माने (शिरोळ) व राजेंद्र घाडगे (मिणचे) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. माने यांनी वस्तीगृहाचे गुणवत्तापूर्ण संस्कार केंद्र म्हणून कौतुक केले.

कार्यक्रमात चेअरमन प्रा. सतीश माने, व्हाईस चेअरमन के. डी. कांबळे, सचिव दीपक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारामुळे सन्मानित व्यक्तींनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत कृतज्ञता व्यक्त केली.


मिस क्लार्क वस्तीगृह हे गुणवत्तेचे संस्कार केंद्र — डॉ. दगडू माने
Total Views: 71