बातम्या
'मिशन ज्ञान कवच'ची कोल्हापूरात सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी गोलाकार बैठक व्यवस्था
By nisha patil - 9/13/2025 4:10:23 PM
Share This News:
'मिशन ज्ञान कवच'ची कोल्हापूरात सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी गोलाकार बैठक व्यवस्था
गेली अनेक वर्षे वर्गामध्ये विद्यार्थी एकामागोमाग बसलेले दिसत होते. मात्र, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हा चित्र बदलत राज्यात एक नवा प्रयोग सुरू केला आहे. पाठीमागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मक भावना वाढू नये आणि त्यांच्यातही आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी आता गोलाकार बैठक व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
या उपक्रमाला 'मिशन ज्ञान कवच' असे नाव देण्यात आले असून, ही पद्धत राबविणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.
साधारणपणे पुढच्या बाकावर बसणारे विद्यार्थी प्रश्नांना उत्तरे देतात आणि शिक्षकांचे लक्ष त्यांच्याकडे अधिक राहते. तर पाठीमागच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कमी जाणवतो. यावर उपाय म्हणून केरळमध्ये दाखवण्यात आलेल्या एका चित्रपटातून प्रेरणा घेतली गेली. त्या आधारावर केरळमध्ये 'यू-आकाराच्या' बसण्याच्या पद्धतीची अंमलबजावणी झाली होती.
याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातही हा प्रयोग करण्यात आला आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्याशी चर्चा करून तातडीने ही बैठक रचना सुरू केली आहे.
👉 या पद्धतीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकांचे समान लक्ष राहील आणि पाठीमागे बसण्यामुळे निर्माण होणारी 'बॅक-बेंचर'ची मानसिकता पूर्णपणे दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
'मिशन ज्ञान कवच'ची कोल्हापूरात सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी गोलाकार बैठक व्यवस्था
|