शैक्षणिक

डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठ व कोकण कृषी विद्यापीठात सामंजस्य करार

MoU between D Y Patil Agricultural

By nisha patil - 4/29/2025 12:17:51 AM
Share This News:

डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठ व कोकण कृषी विद्यापीठात सामंजस्य करार

तळसंदे/दापोली, – डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात कृषी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी सामंजस्य करार झाला.

कराराअंतर्गत विद्यार्थी-प्राध्यापक विनिमय, संयुक्त प्रकल्प, प्रगत संशोधन उपक्रम, आंतरराष्ट्रीय परिषदा व कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. या करारासाठी डॉ. संजय भावे, डॉ. के. प्रथापन, डॉ. हाळदवणेकर, डॉ. मकरंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
हा करार यशस्वी करण्यासाठी डॉ. जनार्दन ढेकळे व डॉ. प्रकाश क्षीरसागर यांनी विशेष मेहनत घेतली.

डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठ व कोकण कृषी विद्यापीठात सामंजस्य करार
Total Views: 110