ताज्या बातम्या
मतदान केंद्रात मोबाईल बंदी; फोटो व्हायरल केल्यास थेट गुन्हा — शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त
By nisha patil - 1/14/2026 5:44:20 PM
Share This News:
मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई करण्यात आली असून १०० मीटर अंतरावरच तपासणी केली जाणार आहे. मतदान करतानाचा फोटो व्हायरल केल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिला.
मतदान केंद्रांपासून २०० मीटरच्या आत पक्षांचे बूथ लावण्यास बंदी आहे. शहरात चार उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली मतदान, मतपेटी वाटप, स्ट्राँग रूम व मतमोजणीसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदान केंद्रात मोबाईल बंदी; फोटो व्हायरल केल्यास थेट गुन्हा — शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त
|