बातम्या
शहाजी लॉ कॉलेजमध्ये ‘मॉक सुप्रीम कोर्ट’ स्पर्धा; विद्यार्थ्यांच्या न्यायाधीश भूमिकेत नैपुण्याची झळाळी
By nisha patil - 11/20/2025 3:36:11 PM
Share This News:
शहाजी लॉ कॉलेजमध्ये ‘मॉक सुप्रीम कोर्ट’ स्पर्धा; विद्यार्थ्यांच्या न्यायाधीश भूमिकेत नैपुण्याची झळाळी
शहाजी लॉ कॉलेजतर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण पाटील आणि डी.डी. शिंदे सरकार कॉलेजचे प्राचार्य आर. नाथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मॉक सुप्रीम कोर्ट’ स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. The Hindu in School या वृत्तपत्राच्या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून हा कार्यक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून एम.डी.एस.एम. कॉलेजचे प्रा. एस.जी. लळे सर आणि डी.डी.एस.एस. कॉलेजचे डॉ. बुसरपली शिंदे हे तज्ज्ञ उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाची कार्यपद्धती, न्यायालयीन वातावरण, कायदेशीर मुद्दे, पुराव्यांचे मूल्यांकन आणि न्यायनिवाड्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभूतीतून समजावून देणे हे होते.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी न्यायाधीश, वकील आणि अभियोग पक्षाच्या भूमिकांमध्ये उतरत विविध प्रकरणांवर युक्तिवाद सादर केले. कायद्याचे बारकावे, तार्किकता, विचारशक्ती आणि उपस्थिती यांचा कस लागणाऱ्या या मॉक कोर्टात विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
या संपूर्ण कार्यक्रमात १९१ विद्यार्थी, B.A, B.Com आणि B.Sc या शाखांतील विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात आणि कायदेशीर समजोत मोठी भर घालणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
शहाजी लॉ कॉलेजमध्ये ‘मॉक सुप्रीम कोर्ट’ स्पर्धा; विद्यार्थ्यांच्या न्यायाधीश भूमिकेत नैपुण्याची झळाळी
|