बातम्या
नगरपरिषदा/नगरपंचायतींसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता समाप्त
By nisha patil - 12/23/2025 5:51:07 PM
Share This News:
नगरपरिषदा/नगरपंचायतींसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता समाप्त
कोल्हापूर, दि. 23 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू केली होती. दि. 29 नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर यांनी दि. 2 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार सर्व 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया दि. 21 डिसेंबर 2025 रोजी होणार असल्याचे नमूद केले होते. तसेच तोपर्यंत संबंधित क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या निर्णयाला मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 5 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशाद्वारे कायम ठेवले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सर्व 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतमोजणी व निकाल घोषित करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याचा अहवाल संबंधित सर्व जिल्ह्यांकडून प्राप्त झाला आहे.
त्याअनुषंगाने, केवळ संबंधित 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रांपुरती लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आणण्यात येत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार के. सूर्यकृष्णमूर्ती, उपसचिव, राज्य निवडणूक आयोग यांनी दिली आहे.
नगरपरिषदा/नगरपंचायतींसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता समाप्त
|