बातम्या

पन्हाळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ चे मतमोजणीची करिता उद्या आदर्श आचारसंहिता

Model code of conduct for counting


By nisha patil - 12/20/2025 4:00:26 PM
Share This News:



पन्हाळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ चे मतमोजणीची करिता उद्या आदर्श आचारसंहिता

पन्हाळा प्रतिनिधी,  शहाबाज मुजावर, सार्वत्रिक निवडणुक २०२५ चे मतदान दि.०२/१२/२०२५ रोजी संपन्न झाले आहे. त्याची  रविवार दि.२१/१२/२०२५ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने नगरपरिषद व नगरपंचायत आदर्श आचारसंहिता लागु आहे. आदर्श आचारसंहिता असल्यामुळे जिंकून आलेले उमेदवार जल्लोषा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवुन कायदा,सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणून खालील निर्बंध जिल्ह्यात लावण्यात आले आहेत.पाच अगर पाच हुन अधिक लोकांनी एकत्र येवुन जमाव जमविणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे फटाके फोडणे,आतिषबाजी, गुलाल उधळणे, गाड्यांच्या पुंगळ्या काढुन गाड्या फिरवता येणार नाही. तसेच उमेदवार किंवा उमेदवारांचे कार्यकर्ते यांचेकडुन कोणत्याही जाती, धर्म, व्यक्ती, गट, पक्ष, पॅनेल यांचे धार्मिक अथवा मानसिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे कोणतेही कृत्य वक्तव्य अथवा हावभाव करु नयेत.

विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते,कोणतीही व्यक्ती राजकीय पक्ष,संस्था यांनी गावातुन,शहरातुन विजयी उमेदवारांची विजयी मिरवणुक,रॅली काढण्यात येणार नाही असे कोणतेही बाधा येणारे कृत्य अगर गैर कृत्य घडुन कायद्याचे उल्लंघन होऊन त्यातुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास त्याबाबत उमेदवार,कार्यकर्त्यांवर वैयक्तीक रित्या जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध  कायद्यातील तरतुदीनसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी नोटीस उमेदवार त्याच्या प्रतिनिधींना दिनांक २०/१२/२०२५ रोजी १२,०० वाजता पन्हाळा नगरपरिषद हॉल या ठिकाणी मीटिंग बोलवुन माहिती देण्यात आली आहे.
         

त्यामध्ये जिंकणारा उमेदवाराला अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावेळी वरील नियमांचाचा उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिला आहे. तसेच यावेळी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी,माधवी शिंदे-जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,चेतनकुमार माळी  उमेदवार व प्रतिनिधी यांना मार्गदर्शन करत होते.


पन्हाळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ चे मतमोजणीची करिता उद्या आदर्श आचारसंहिता
Total Views: 225