बातम्या
कोल्हापुरी चप्पल उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती – वारशाला नवी दिशा!
By nisha patil - 10/29/2025 5:36:45 PM
Share This News:
कोल्हापुरी चप्पल उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती – वारशाला नवी दिशा!
कोल्हापूर : विज्ञान युगात बदल स्वीकारले नाहीत, तर मागे राहावे लागेल, असा इशारा देत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माणगावे यांनी कोल्हापुरी चप्पल उद्योगालाही काळानुरूप परिवर्तन करण्याचे आवाहन केले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात चप्पल उत्पादक व कारागिरांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. माणगावे म्हणाले, “कोल्हापुरी चप्पल ही केवळ परंपरा नसून कोल्हापूरचा जागतिक वारसा आहे. त्याचे संरक्षण आणि संवर्धन आधुनिक तंत्रज्ञानानेच शक्य आहे.”
क्यूआर कोड, एनएफसी चीप आणि ब्लॉकचेन प्रणालीमुळे चप्पलचा दर्जा आणि उत्पादकांची खरी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे नकली चप्पल विक्री थांबेल आणि कारागिरांना योग्य मूल्य मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत इमरटेक इनोव्हेशनचे गौरव सोमवंशी यांनी या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष सादरीकरण केले.
कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले की, कातडी उद्योग बंद झाल्याने आता कातडे दक्षिण भारतातून मागवावे लागते. या क्षेत्रात पारदर्शकता आणि नवोन्मेष आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले, तर आभार धनंजय दुग्गे यांनी मानले.
कोल्हापुरी चप्पल उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती – वारशाला नवी दिशा!
|