विशेष बातम्या

मोदी सरकारने घडवले विकसित भारताचे स्वप्न"

Modi government has created the dream of a developed India


By nisha patil - 6/16/2025 5:00:16 PM
Share This News:



मोदी सरकारने घडवले विकसित भारताचे स्वप्न"

 "सेवा, सुशासन आणि सशक्त भारताचा संकल्प – मोदींच्या नेतृत्वातील दशकभराचा ठसा"

मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात "सेवा...सुशासन आणि गरीब कल्याण" यांचा प्रभावी संगम साधण्यात आला आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने दहशतवादाला सडेतोड उत्तर दिले, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवली, आणि अर्थव्यवस्थेपासून ते अंतराळ मोहीमांपर्यंत अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले. अशी माहिती हस्तात धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी बोलताना त म्हणाले की..डिजिटल व्यवहार, थेट लाभ हस्तांतरण, जलद पायाभूत विकास, गरीब-शेतकरी कल्याण योजना, नारीशक्ती सन्मान, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील मोठ्या सुधारणा यामुळे देशाला 'विकसित भारत' बनवण्याची गती मिळाली आहे.
काश्मीरमधील ३७० कलम रद्दीकरण, चांद्रयान-३, वंदे भारत रेल्वे, जनधन योजना, मुद्रा कर्ज, पीएम किसान निधी यांसारख्या योजनेमुळे जनतेच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडला असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं


मोदी सरकारने घडवले विकसित भारताचे स्वप्न"
Total Views: 105