बातम्या

आई, हा शेवटचा कॉल...म्हणत  फुटबॉलपटूने आयुष्याला दिला विराम

Mom this is the last call


By nisha patil - 11/6/2025 2:51:12 PM
Share This News:



आई, हा शेवटचा कॉल...म्हणत  फुटबॉलपटूने आयुष्याला दिला विराम

 राजाराम तलावात काळजाचा ठाव घेणारी हाक — २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

कसबा बावड्यातील माळ गल्ली येथे राहणाऱ्या २७ वर्षीय हर्षवर्धन अशोक काळे या तरुणाने राजाराम तलाव परिसरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. फुटबॉलपटू असलेल्या हर्षवर्धनने आईला फोन करत भावनिक निरोप दिला — "आई, हा तुला केलेला माझा शेवटचा कॉल आहे" असे सांगत बोलणं संपवलं.

हर्षवर्धन एका पतसंस्थेत पिग्मी एजंट व खाजगी संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत होता. सकाळी ९ वाजता तो घरातून बाहेर पडला. लोकेशनवरून नातेवाईकांनी शोध घेतला असता तो राजाराम तलाव परिसरात बेहोश स्थितीत आढळून आला. सीपीआर आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर दुर्दैवाने त्याचे उपचारादरम्यान निधन झाले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे.


आई, हा शेवटचा कॉल...म्हणत  फुटबॉलपटूने आयुष्याला दिला विराम
Total Views: 185