विशेष बातम्या

१२ ते १५ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय; 

Monsoon will be active again from June 12 to 15


By nisha patil - 3/6/2025 6:24:25 PM
Share This News:



१२ ते १५ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय; 

मशागतीची कामे लवकर उरकण्याचा हवामानतज्ज्ञांचा सल्ला

राज्यात १२ ते १५ जूनदरम्यान मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी त्या अगोदर मशागतीची कामे पूर्ण करून तयारीत राहावे, असा सल्ला ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी 'साबळे मॉडेल'च्या आधारे यंदाच्या मान्सून हंगामाचा सखोल अंदाज सादर केला. राज्यात यंदा १०६% पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता असून, जून-जुलैमध्ये काही भागांमध्ये पावसाचा खंड राहू शकतो, असेही ते म्हणाले.

डॉ. साबळे यांनी सांगितले की, "सध्या ज्या शेतकऱ्यांकडे भारी जमीन आहे, त्यांनी पेरणी करणे फायदेशीर ठरेल. मात्र, हलक्या व भरड जमिनीत पाणी खोलवर मुरत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी घाई करू नका. मोठ्या पावसाची वाट पाहूनच पेरणी करा."

मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नेमक्या कारणांवरही त्यांनी प्रकाश टाकला आणि हवामान बदलाच्या संदर्भातील जागरूकता वाढवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योजनाबद्ध शेती करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


१२ ते १५ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय; 
Total Views: 190