बातम्या
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी देशभरातून 2 लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या...
By nisha patil - 2/8/2025 2:56:12 PM
Share This News:
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी देशभरातून 2 लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या...
स्वाक्षरी फॉर्म राष्ट्रपतींना पाठवले जाणार : आमदार सतेज पाटील
कोल्हापूर : महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी देशभरातून चालवण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला मोठा प्रतिसाद लाभला असून, तब्बल 2 लाख 4 हजार 421 नागरिकांनी यासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या सर्व स्वाक्षरी फॉर्मसह ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदणी मठाकडे लोकांसह विशेष प्रयाण करण्यात आले.
नांदणी मठाचे महास्वामीजी यांच्या हस्ते या सर्व स्वाक्षरी फॉर्मचे धार्मिक विधीपूर्वक पूजन करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 1 वाजता रमणमळा पोस्ट ऑफिस, कोल्हापूर येथून हे संपूर्ण पत्रक राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले जाणार आहे, यावेळी आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमामुळे महादेवी हत्तीणीच्या परतीसाठी जनतेचा आवाज अधिक प्रभावीपणे राष्ट्रपतींपर्यंत पोहोचणार असून, या मागणीला आता राष्ट्रीय स्वरूप मिळाले आहे.
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी देशभरातून 2 लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या...
|