राजकीय
स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसमध्ये २४ हून अधिक इच्छुक...
By nisha patil - 1/22/2026 12:10:24 PM
Share This News:
स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसमध्ये २४ हून अधिक इच्छुक...
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. मात्र या स्पर्धेत केवळ पदाची अपेक्षा नव्हे, तर पक्षासाठी निष्ठेने झटलेल्या, माघार घेऊनही उमेदवाराच्या विजयासाठी काम केलेल्या आणि पराभव स्वीकारूनही संघटन मजबूत ठेवणाऱ्या २४ हून अधिक जणांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून मागणी केली आहे.
महापालिकेत दहा निवडून आलेल्या नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य अशी रचना असून एकूण आठ स्वीकृत सदस्य असणार आहेत. यापैकी तीन ते चार जागा काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ३४ तर उद्धवसेनेचा १ असे एकूण ३५ नगरसेवक निवडून आले आहेत.
स्वीकृत पदासाठी अनुभवी आणि पक्षासाठी सातत्याने काम करणारे कार्यकर्ते व नेतृत्व क्षमता असलेले सदस्य म्हणून काँग्रेसकडून भूपाल शेटे, राहुल माने, मधुकर रामाणे, दिग्विजय सूर्यवंशी तसेच महिला कार्यकर्त्यांमध्ये अहोरात्र झटणाऱ्या पूजा आरडे यांची नावे पुढे येत आहेत. पक्षनिष्ठा, संयम आणि संघटनासाठी दिलेले योगदान यामुळे या कार्यकर्त्यांची तसेच माजी नगरसेवकांची नावे पुढे येत आहेत.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसमध्ये २४ हून अधिक इच्छुक...
|