बातम्या
हत्ती परत यावा यासाठी दोन लाखांहून अधिक जनतेची मागणी...
By nisha patil - 2/8/2025 4:08:58 PM
Share This News:
हत्ती परत यावा यासाठी दोन लाखांहून अधिक जनतेची मागणी...
गुगल फॉर्मचा उपयोग करून राष्ट्रपतींना पाठवले अर्ज
नांदणी (ता. कागल) येथील माधुरी हत्तीनीला पुन्हा तिच्या मूळ परिसरात परत आणण्याची जनतेची मागणी अधिकच तीव्र झाली आहे. यासाठी खास ‘गुगल फॉर्म’च्या माध्यमातून व्यापक जनसमर्थन उभं करण्यात आलं. तब्बल 2 लाख 4 हजार 421 नागरिकांनी हत्ती परत यावा यासाठी सहमती दर्शवली असून हे अर्ज पोस्ट विभागामार्फत संबंधित महामहीम राष्ट्रपतींच्याकडे पाठवण्यात येणार आहेत.
या सर्व प्रक्रियेचा उद्देश राष्ट्रपतींकडे लक्ष वेधून माधुरी हत्तीनी बाबत योग्य निर्णय घेणे हा आहे. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी जनतेच्या भावना लक्षात घेता राष्ट्रपतींनी यात लक्ष घालून संवेदनशील निर्णय घ्यावा, हीच सदिच्छा आहे.”
हत्ती परत यावा यासाठी दोन लाखांहून अधिक जनतेची मागणी...
|