बातम्या

नदीकाठावरील गावातील मोटर पंपाच्या केबल चोरीमुळे शेतकरी हवालदिल

Moter


By nisha patil - 4/6/2026 1:49:15 PM
Share This News:



**नदीकाठावरील गावातील मोटर पंपाच्या केबल चोरीमुळे शेतकरी हवालदिल*

 आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा तालुक्यातील कृषी पंपाच्या इलेक्ट्रिक केबल चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या टोळीचे शेतकऱ्यांना आव्हान झाले आहे.

हिरण्याकेशी नदीकाठावरील हाजगोळी खुर्द व चांदेवाडी गावातील अंदाजे 20 ते 25 शेतकऱ्यांच्या मोटर पंपाच्या तांब्याच्या केबल अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याचे निदर्शनास आले आहे. या अगोदरही पेद्रेवाडी आणि परिसरात असाच प्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते.

    तांबा धातू आता जास्त किंमतीला विकला जातो. त्यामुळे चोरट्यानी तांब्याचे केबल चोरण्याचा प्रकार अवलंबला आहे. पोलिसात तक्रार देण्यास जास्त कोणी धजावत नसल्याने या चोरट्यांचे फावले आहे. परंतु काल नाना गुंजकर यांनी याबाबत आजरा पोलिसात तक्रार दिल्याचे समजते. केबलचे दर वाढल्याने चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. गेली 5 ते 6 महिने नदीकाठावरील गावात चोरांचा धुमाकूळ सुरु असलेबाबत डॉ. रोहन जाधव यांनी सांगितले. परवा रात्री हजगोळी खुर्द येथील शेतकरी रवींद्र जाधव, संदीप गिलबिले, आनंदा घेवडे, बाबुराव गिलबिले, आनंदा जाधव, शामराव गिलबिले, अरुण गुरव, दिनकर गिलबिले तसेच इतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या केबल चोरीस गेल्या असल्याबाबत डॉ. जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.


नदीकाठावरील गावातील मोटर पंपाच्या केबल चोरीमुळे शेतकरी हवालदिल
Total Views: 534