ताज्या बातम्या

‘मदर ऑफ ट्री’ हिम्मक्का यांचे निधन; पर्यावरणप्रेमींच्या मनात कायमची आठवण

Mother of Trees


By nisha patil - 11/15/2025 11:35:29 AM
Share This News:



पर्यावरणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या 114 वर्षीय हिम्मक्का यांचे नुकतेच शांतपणे निधन झाले. आपल्या सर्वच आयुष्याचा काळ वृक्षारोपणाला वाहून घेतलेल्या या मातृशक्तीने मागे अमूल्य असा हिरवागार वारसा सोडला असून त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे.

बालवयातच कठीण परिस्थिती

कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात जन्मलेल्या हिम्मक्का यांचे शिक्षण केवळ 12व्या वर्षापर्यंत झाले. आर्थिक अडचणी, कष्टमय जीवन आणि संतान नसल्याच्या वेदना सहन करत असताना त्यांनी झाडांमध्येच समाधान शोधले आणि याच मार्गावर आयुष्य वाहिले.

आयुष्याची 80 वर्षे झाडांना

हिम्मक्कांनी तब्बल ८० वर्षांच्या मेहनतीने ८,००० पेक्षा जास्त झाडे लावली. प्रत्येक झाडाला लेकरासारखी जपणूक देत त्या त्यांची देखभाल करीत. सुरुवातीला त्या केवळ १० रोपे दरवर्षी लावत; मात्र नंतर ही संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यांच्या वृक्षारोपण मोहिमेने अनेक गावांना हिरवाईची नवी ओळख दिली.

‘मदर ऑफ ट्री’ म्हणून ओळख

पतींच्या निधनानंतरही हिम्मक्का यांनी वृक्षारोपणाचा संकल्प सोडला नाही. दाम्पत्याने मिळून जवळपास ४०० पेक्षा अधिक बडाज वृक्ष वाढवले. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांना लोक ‘Mother of Tree’ म्हणून ओळखू लागले.

मान्यतांची शृंखला

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 1995 मध्ये त्यांना राष्ट्रीय नागरीक पुरस्कार मिळाला. 2019 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री प्रदान करण्यात आला. 2020 मध्ये केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटकने मानद डॉक्टरेट बहाल केली.

प्रेरणादायी वारसा

पर्यावरण संवर्धनासाठी केलेले त्यांचे अढळ योगदान आणि त्यांनी लावलेली हजारो झाडे हेच त्यांचे खरे स्मारक आहे. तरुण पिढीला पर्यावरण संवर्धनाची दिशा देणे हाच त्यांचा सर्वात मोठा संदेश आहे.


‘मदर ऑफ ट्री’ हिम्मक्का यांचे निधन; पर्यावरणप्रेमींच्या मनात कायमची आठवण
Total Views: 23