बातम्या

सौ. नीलम बनछोडे यांना ‘अमालिया स्त्री गौरव’साठी मजबूत दावेदारी

Mrs Neelam Banchode has a strong claim for Amalia Stree Gaurav


By Administrator - 3/17/2026 2:46:27 PM
Share This News:



सौ. नीलम बनछोडे यांना ‘अमालिया स्त्री गौरव’साठी मजबूत दावेदारी

कोल्हापूर परिसरातील सौ. नीलम सुरेश बनछोडे या आपल्या जिद्दी, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर ‘अमालिया स्त्री गौरव पुरस्कार’ासाठी पात्र ठरत आहेत. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून त्यांनी तब्बल 1500 ते 1600 स्पर्धांमध्ये सहभागी होत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

ऑनलाइन असो वा ऑफलाइन, प्रत्येक स्पर्धेत त्यांनी तितक्याच उत्साहाने सहभाग नोंदवत आपली विजयी वृत्ती सिद्ध केली आहे.
वेशभूषा, पाककला, फॅशन शो, निबंध आणि स्लोगन स्पर्धांमध्ये त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. अनेक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी हार न मानता प्रत्येक वेळी नव्या जोमाने उभे राहत यश मिळवले.

 

त्यांच्या या प्रवासाची दखल घेत आज त्यांना विविध स्पर्धांमध्ये परीक्षक (जज) म्हणूनही निमंत्रित केले जाते. स्थानिक वृत्तपत्रे, केबल टीव्ही आणि रेडिओवर त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे.
केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता त्यांनी समाजातील महिलांसाठी प्रेरणास्थान निर्माण केले आहे. दुर्बल व सर्वसामान्य महिलांना काहीतरी करण्याची उर्मी देत त्यांनी आत्मविश्वासाचा नवा मार्ग दाखवला आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेतही एक महिला आपल्या जिद्दीने मोठे यश मिळवू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सौ. नीलम बनछोडे.


सौ. नीलम बनछोडे यांना ‘अमालिया स्त्री गौरव’साठी मजबूत दावेदारी
Total Views: 35