शैक्षणिक

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या कु. निहाली पाटीलची महाराष्ट्र संघात निवड

Ms Nihali Patil of Vivekananda College


By nisha patil - 10/11/2025 12:30:21 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. 10 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या विद्यमाने तसेच जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी यांच्या मार्फत दि. 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे 19 वर्षाखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तर शालेय टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या उत्कृष्ट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 11 वी सायन्समध्ये शिकणारी कुमारी निहाली निवास पाटील हिची जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. निहालीच्या या उल्लेखनीय यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी खेळाडू —

🏓 मुलांचा संघ (तृतीय क्रमांक)

  1. ईशान सुभाष पटेल

  2. केतन विनायक सुतार

  3. वेदांत राजेंद्र पाटील

  4. शिवम राजू गुप्ता

  5. सोहम शिवकुमार चव्हाण

🏓 मुलींचा संघ (द्वितीय क्रमांक)

  1. निहाली निवास पाटील

  2. माही पुष्कराज जनवाडकर

  3. समीक्षा युवराज पोवार

  4. समृद्धी संदीप हजारे

या यशासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, तसेच रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे व श्री. सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.


राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या कु. निहाली पाटीलची महाराष्ट्र संघात निवड
Total Views: 33