शैक्षणिक
विवेकानंद महाविद्यालयाच्या कु. ऋतुजा एकुंडे यांना “प्रा. सी. डी. लोखंडे एण्डोमेंट चॅरिटेबल ट्रस्ट रिसर्च फेलोशिप”
By nisha patil - 10/12/2025 4:36:39 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयाच्या कु. ऋतुजा एकुंडे यांना “प्रा. सी. डी. लोखंडे एण्डोमेंट चॅरिटेबल ट्रस्ट रिसर्च फेलोशिप”
कोल्हापूर दि. 10 : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील भौतिकशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी कु. ऋतुजा अनिल एकुंडे यांची “प्रा. सी. डी. लोखंडे एण्डोमेंट चॅरिटेबल ट्रस्ट रिसर्च फेलोशिप २०२५–२६” ही प्रतिष्ठित संशोधन फेलोशिप मिळाली आहे. कु. ऋतुजा एकुंडे या पीएचडीच्या विद्यार्थिनी डॉ. संजय लठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य करत असून त्यांचे संशोधन ‘फोटोथर्मल सुपरहायड्रोफोबिक कोटिंग्स फॉर सेल्फ-क्लीनिंग अँड सेल्फ-स्टेरिलायझिंग ॲप्लिकेशन्स’ या विषयावर आधारित आहे.
या फेलोशिप संदर्भातील सत्कार डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर येथे करण्यात आला. या प्रसंगी प्रा. सी. डी. लोखंडे, डीन, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, कोल्हापूर यांच्या हस्ते कु. ऋतुजा एकुंडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रा. डॉ.पी. एस. पाटील, रिसर्च डायरेक्टर, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, कोल्हापूर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. डी. सरताळे हे विशेष मान्यवर म्हणून उपस्थित होते.
कु. ऋतुजा एकुंडे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, सीईओ श्री. कौस्तुभ गावडे, आणि प्रबंधक श्री सचिन धनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद महाविद्यालयाच्या कु. ऋतुजा एकुंडे यांना “प्रा. सी. डी. लोखंडे एण्डोमेंट चॅरिटेबल ट्रस्ट रिसर्च फेलोशिप”
|