बातम्या
मुगळीच्या बाबासाहेब सांगले यांची मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते समितीवर निवड
By Administrator - 3/4/2026 5:08:07 PM
Share This News:
मुगळीच्या बाबासाहेब सांगले यांची मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते समितीवर निवड
प्रगतशील शेतकऱ्याला सन्मान; कागल मतदारसंघात अभिमानाची भावना
सांगले यांच्या निवडीने मुगळीच्या विकासाला मिळणार नवी गती
कागल : कागल विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते समितीवर मुगळी गावचे प्रगतशील शेतकरी व माजी उपसरपंच बाबासाहेब शिवाजीराव सांगले यांची निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेती क्षेत्रातील प्रगत कामकाज, तसेच ग्रामविकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे सांगले यांची ही निवड अभिमानास्पद मानली जात आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची व समाजाप्रती असलेल्या निष्ठेची ही पावती असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सांगले यांच्या निवडीमुळे मुगळी गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये विशेषतः रस्ते विकासाला गती मिळणार असून, शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही संधी महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल मुगळी ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
मुगळीच्या बाबासाहेब सांगले यांची मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते समितीवर निवड
|