विशेष बातम्या
फेब्रुवारीत ‘मुंबई क्लायमेट वीक’चे आयोजन — मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
By nisha patil - 10/28/2025 4:47:12 PM
Share This News:
फेब्रुवारीत ‘मुंबई क्लायमेट वीक’चे आयोजन — मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई, दि. २८ : भारताच्या हवामान कृती नेतृत्वाला अधोरेखित करणारा ‘मुंबई क्लायमेट वीक’ हा जागतिक स्तरावरील कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘प्रोजेक्ट मुंबई’च्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे.
या परिषदेत ३० हून अधिक देशांतील अभ्यासक, तज्ज्ञ आणि धोरणकर्ते सहभागी होणार असून अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी सक्षमता या विषयांवर सखोल चर्चा होईल. शहरभर विविध प्रदर्शने, कार्यशाळा, कला, क्रीडा, आरोग्य आणि क्लायमेट फूड फेस्टिव्हल आयोजित केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आता कृतीची वेळ आली आहे. हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यावे.”
या उपक्रमाचे नॉलेज पार्टनर मॉनिटर डिलॉईट असून क्लायमेट ग्रुप, युनिसेफ, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, शक्ती फाउंडेशन आदी संस्था सहभागी होणार आहेत.
फेब्रुवारीत ‘मुंबई क्लायमेट वीक’चे आयोजन — मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
|