बातम्या
कोल्हापूर बनावट नोटा प्रकरणात मुंबई कनेक्शन; एक कोटींच्या नोटा जप्त
By Administrator - 10/13/2025 5:00:23 PM
Share This News:
कोल्हापूर बनावट नोटा प्रकरणात मुंबई कनेक्शन; एक कोटींच्या नोटा जप्त
कोल्हापुरातील सिद्धलक्ष्मी चहा कंपनीच्या कार्यालयात मिरजेच्या गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून बनावट नोटा तयार करण्याचा उद्योग उघडकीस आणला. पोलिसांनी झेरॉक्स मशीन, नोटा मोजण्याचे मशीन, स्कॅनर, प्रिंटर, एक चारचाकी वाहन आणि ५०० व २०० रुपयांच्या एकूण १ कोटी ११ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
या प्रकरणात पोलिस हवालदार इब्रार इनामदार, सुप्रीत देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे व सिद्धेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. इब्रारने मुंबईत काम करणाऱ्या आपल्या ओळखीच्या म्हात्रेस या बनावट नोटा व्यवसायात सामील केले. पोलिसांना संशय आहे की, म्हात्रेच्या माध्यमातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर नोटा वितरित केल्या गेल्या. म्हात्रेने नोटा आणखी कोणाला दिल्या, याचा सखोल तपास सुरू असून, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नोटा खपविण्याची जबाबदारी सुप्रीत देसाईकडे होती. मात्र, निवडणुकीपूर्वीच टोळीचा भांडाफोड झाल्याने गैरव्यवहार टळला. या प्रकरणातील सूत्रधार इब्रार इनामदाराला कोल्हापूर पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे.
कोल्हापूर बनावट नोटा प्रकरणात मुंबई कनेक्शन; एक कोटींच्या नोटा जप्त
|